
निधन वार्ता
87709
नीला पालकर
‘आविष्कार’च्या माजी अध्यक्षा
नीला पालकर यांचे निधन
रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि आविष्कार संस्थेच्या माजी अध्यक्ष श्रीमती नीला मोहन पालकर (वय ७२) यांचे आज निधन झाले. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या त्या पाच वर्ष अध्यक्ष होत्या.
त्या आविष्कारच्या संस्थापक सदस्य होत्या. १९९६ ते २००४ आणि २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी आविष्कार संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या जाण्याने आविष्कार संस्थेने खंदा कार्यकर्ता गमावला आहे. नीलाताई या ग्राहक मंचाच्या सलग दहा वर्ष सदस्य होत्या. टिळक स्मारक मंदिर भगिनी मंडळाच्या काही काळ अध्यक्ष होत्या. त्यांनी आकाशवाणीवर निवेदिका म्हणूनही काम केले. शहरातील विठ्ठल मंदिर येथे दरमहा सुरू असलेल्या अध्यात्मिक प्रवचन, व्याख्यानमालांचे नियोजन त्या करायच्या. डॉ. मोहन पालकर व नीलाताई पालकर या दाम्पत्याने रत्नागिरीकरांसाठी वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्ममयाचा त्यांनी अभ्यास केला होता. त्या संबंधी त्यांनी बरीच प्रवचनेही दिली. मुरगूडच्या देशमुखकाकांच्या त्या अनुग्रहित होत्या. नीलाताई पालकर यांच्या निधनाने या क्षेत्रातील विविध व्यक्तींनी शोक व्यक्त केला. नीलाताईंच्या मागे दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.
87722
शशिकांत कुळकर्णी यांचे निधन
रत्नागिरी ः मिठगवाणे (ता. राजापूर) येथील रहिवासी शशिकांत विष्णू उर्फ काका कुळकर्णी (वय ८७) यांचे ६ मार्चला वृद्धाकाळाने निधन झाले. शिवाजी चौक येथे गावातील सर्वात जुने दुकानदार म्हणून काका कुळकर्णी गावात सुपरिचित होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार गोळा केला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी गावात दुकान उभे करत ते नेटाने चालवले. गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव अंजेश्वराच्या प्रत्येक उत्सवात त्यांचा हिरीरिने सहभाग होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
87766
शोभा वाईरकर यांचे निधन
मालवण : शहरातील बांगीवाडा येथील शोभा शशिकांत वाईरकर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, पुतणी असा परिवार आहे. बांगीवाडा येथील उन्मेष पेडणेकर आणि मिलिंद पेडणेकर यांच्या त्या आत्या होत.