जिल्ह्यातील 3 पाणीयोजना महिला बचतगटाकडे

जिल्ह्यातील 3 पाणीयोजना महिला बचतगटाकडे

rat०८३७.TXT

बातमी क्र.. ३७ (पान ३ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
- rat८p३६.jpg-
८७७४४
रत्नागिरी ः बचतगटांना प्रमाणपत्र सादर करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार.
--
जिल्ह्यातील तीन पाणीयोजना महिला बचतगटाकडे

प्रमाणपत्र देऊन गौरव ; सेवापुरवठादार म्हणून गटांनी काम करावे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः देखभाल व दुरुस्तीसाठी नळपाणी पुरवठा योजना प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील तीन महिला बचतगटाकडे देण्यात आल्या आहेत. त्या बचतगटातील महिलांचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि रत्नागिरी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन (कै.) शामरावजी पेजे सभागृहात येथे करण्यात आले होते. महिला मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीसाठी नळपाणी पुरवठा योजना महिला बचतगटाकडे देण्यात आल्या आहेत. यामध्ये इंदवटी क्रांती उत्पादक महिला बचतगट (ता. लांजा), मालगुंड जिजाऊमाता महिला बचतगट (ता. रत्नागिरी) व धाऊलवल्ली स्वामिनी महिला बचतगट (ता. राजापूर) या बचतगटांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी कीर्तीकिरण पूजार यांनी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांची संचालन, देखभाल दुरुस्ती व नियोजन हे महिला बचतगटांना देण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत. महिला बचतगटाने सेवापुरवठादार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे.
या मेळाव्याला प्रकल्प संचालक राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी गावडे, उमेदच्या प्रतिनिधी वायंगणकर, बोरकर व महिला बचतगटाच्या सदस्या व आशा सेविका उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com