लांजा-कुणबी विकास पतसंस्थेने केला महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-कुणबी विकास पतसंस्थेने केला महिलांचा सन्मान
लांजा-कुणबी विकास पतसंस्थेने केला महिलांचा सन्मान

लांजा-कुणबी विकास पतसंस्थेने केला महिलांचा सन्मान

sakal_logo
By

rat8p39.jpg
87758
लांजाः येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्यावतीने महिला दिनी सन्मान करण्यात आला.
-----------------
कुणबी विकास पतसंस्थेने
केला महिलांचा सन्मान
लांजा, ता.८ः चूल आणि मूल या जुन्या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्यावतीने महिला दिनी बुधवारी (ता.८) मार्चला सन्मान करण्यात आला.
महिलादिनाचे औचित्य साधून कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये हा महिला सन्मान कार्यक्रम झाला. आज अनेक महिला या उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या यशस्वीपणे सांभाळून घरसंसारदेखील तितक्याच ताकतीने पेलत आहेत आणि म्हणूनच लांजा शहर व तालुक्यातील अशा गौरवशाली महिलांचा महिलादिनी सन्मान करण्याचा कार्यक्रम कुणबी विकास सहकारी पतसंस्थेने हाती घेतला होता.
या कार्यक्रमात प्रभानवल्ली शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया मांडवकर, वकील स्मिता मांडवकर, ग्रामसेविका उज्ज्वला मांडवकर, लांजातील ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षिका छाया गांगण आणि येथील दत्तभेळच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात पाय ठेवणाऱ्या वैदेही वणजू तसेच प्रभावती जाधव या महिलांचा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.