Sun, June 4, 2023

लांजा-कुणबी विकास पतसंस्थेने केला महिलांचा सन्मान
लांजा-कुणबी विकास पतसंस्थेने केला महिलांचा सन्मान
Published on : 8 March 2023, 4:04 am
rat8p39.jpg
87758
लांजाः येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्यावतीने महिला दिनी सन्मान करण्यात आला.
-----------------
कुणबी विकास पतसंस्थेकडून महिलांचा सन्मान
लांजा, ता.८ः चूल आणि मूल या जुन्या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्यावतीने महिला दिनी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रभानवल्ली शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया मांडवकर, वकील स्मिता मांडवकर, ग्रामसेविका उज्ज्वला मांडवकर, लांजातील ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षिका छाया गांगण आणि दत्तभेळच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात पाय ठेवणाऱ्या वैदेही वणजू तसेच प्रभावती जाधव या महिलांचा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.