संक्षिप्त-भोसले नॉलेज सिटीमध्ये ''नाते तुझे नि माझे'' स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-भोसले नॉलेज सिटीमध्ये 
''नाते तुझे नि माझे'' स्पर्धा
संक्षिप्त-भोसले नॉलेज सिटीमध्ये ''नाते तुझे नि माझे'' स्पर्धा

संक्षिप्त-भोसले नॉलेज सिटीमध्ये ''नाते तुझे नि माझे'' स्पर्धा

sakal_logo
By

सावंतवाडी, मालवणात
संविधान संवादशाळा
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने १८ व १९ मार्चला सावंतवाडी व मालवण येथे एकदिवसीय संविधान संवादशाळा ‘चला संविधान समजून घेऊ या’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. १८ ला श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी व १९ ला बॅ. नाथ पै सेवांगण येथे सकाळी ९.३० ते ५ वाजेपर्यंत या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोप्या शब्दात संविधानाची तोंडओळख, विविध उपक्रमांद्वारे संविधान संवाद, खेळ, गाणी, गप्पा गोष्टी, चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र हे या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत. प्रशिक्षणार्थींना प्रवेश निःशुल्क असणार आहे. पूर्वनोंदणी आवश्यक आहे. सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थीनी १६ मार्चपर्यंत सावंतवाडीकरिता संदीप निंबाळकर, मालवणसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण, बार्टी समतादूत व फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
---
‘नाते तुझे नि माझे’ स्पर्धा शनिवारी
सावंतवाडी ः येथील भोसले नॉलेज सिटीच्यावतीने महिलादिनानिमित्त ''नाते तुझे नि माझे '' स्पर्धेचे आयोजन शनिवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. यामध्ये आई व मुले यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचे सादरीकरण करावयाचे आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या आई व मुलगा-मुलगी यांच्या जोडीने पाच मिनिटांच्या कालावधीत वेशभूषा, अभिनय, वक्तृत्व, गाणे किंवा नृत्य यापैकी कोणत्याही माध्यमातून हे सादरीकरण करावयाचे आहे. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. ५ ते १० वर्षे वयोगटातील मुले व त्यांची आई यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.