महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे
महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे

महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे

sakal_logo
By

87776
ओसरगाव : येथील माता वैष्णोदेवी महाविद्यालयात ॲड. स्वाती तेली यांनी मार्गदर्शन केले.

महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे

ॲड. स्वाती तेली ः ओसरगाव येथे जागतिक महिलादिन

कणकवली, ता. ८ : ‘‘महिलांना त्‍यांचे हक्‍क आणि बरोबरीचे स्थान मिळवायचे असेल तर त्‍यांनी आर्थिक सक्षम व्हावे. त्‍यासाठी रोजगाराचे अनेक पर्याय पडताळून पाहायला हवेत,’’ असे प्रतिपादन ॲड. स्वाती तेली यांनी केले.
ओसरगाव येथील माता वैष्णोदेवी महाविद्यालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तेली बोलत होत्या. यावेळी ॲड. तेली यांनी ‘महिलांचे हक्क व भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी मानवी मूल्ये, महिलांचे हक्क, महिलांसाठी असलेले महत्त्वाचे कायदे याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य समीर तारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या महिलांच्या यशोगाथेची उदाहरणे दिली. तसेच आजही ग्रामीण भागात मुलगा असेल तर त्याच्या गरजांकडे प्राधान्याने पाहिले जाते, मुलगी असल्यास तिचे लग्न करून दिले की आपली जबाबदारी संपली म्हणून मुलींच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. हे चित्र बदलण्याची गरज आहे, असे मत मांडले. यावेळी ओसरगाव येथील जिल्‍हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कदम यांनीही विचार मांडले.