हरकती स्वीकारणारा अधिकारीच गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकती स्वीकारणारा अधिकारीच गायब
हरकती स्वीकारणारा अधिकारीच गायब

हरकती स्वीकारणारा अधिकारीच गायब

sakal_logo
By

rat०८४०.txt

बातमी क्र..४० ( पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat८p३८.jpg ः
८७७५७
गुहागर : नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत थांबलेले नागरिक.
--
हरकती स्वीकारणारा अधिकारीच गैरहजर

गुहागर नगरपंचायत ; आरक्षण प्रश्न तापत चालला

गुहागर, ता. ८ ः नगरपंचायत कार्यालयात जनतेच्या हरकती नोंदवण्यासाठी नेमलेला अधिकारी बुधवारी (ता. ८) दुपारपासून नगरपंचायतीकडे फिरकलाच नाही. त्यामुळे विकास आराखड्याची माहिती घेण्यासाठी व हरकती नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांना दोन तास वाट पाहून माघारी फिरावे लागले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही फोन संबंधित अधिकाऱ्याने उचलले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
सध्या गुहागर शहराचा विकास आराखड्यामुळे गुहागरमधील वातावरण तापले आहे. अनेक नागरिकांना आपल्या जागेवर आरक्षण आहे का त्याची माहिती नाही. आरक्षणावर हरकत घ्यायची असेल तर आवश्यक माहिती मिळवण्यासाठी हे नागरिक मोठ्या संख्येने नगरपंचायतीत येतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नगरपंचायतीमध्ये एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी शहर विकास आराखडा, त्यातील आरक्षणे कोणत्या जमिनीवर आहेत, त्या जमिनीचा तपशील आदी माहिती नागरिकांना देतात. हरकत कशी नोंदवावी याचेही मार्गदर्शन करतात.
बुधवारी (ता. ८) दुपारी दोन-तीन नागरिकांना माहिती दिल्यानंतर भोजनाच्या सुट्टीत ते नगरपंचायतीतून बाहेर पडले ते पुन्हा नगरपंचायत कार्यालयात आलेच नाहीत. काही नागरिक दुपारी ३ वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत नगरपंचायत कार्यालयात हरकती नोंदवण्यासाठी, हरकतींची माहिती घेण्यासाठी आले होते; मात्र त्यांची आणि या अधिकाऱ्याची भेटच होऊ शकली नाही. नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांनीदेखील दूरध्वनीवरून संपर्क केला; मात्र तो फोनदेखील त्यानी उचलला नाही. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये आलेले नागरिक संतप्त झाले होते.
भाजपचे उपाध्यक्ष किरण खरे हे देखील विकास आराखड्यातील काही आरक्षणाची तपशिलात माहिती घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आले होते. तीन तास किरण खरे नगरपंचायतीत बसून होते; मात्र अधिकारी नगरपंचायतीत आले नाहीत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे खरे यांनी तक्रार केली. त्यावर गुरूवारपासून दररोज एक अधिकारी कार्यालयीन वेळेत विकास आराखड्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित असेल, असे आश्वासन शिंगटे यांनी दिले आहे.
-
कोट
अनेक नागरिक आपल्या जागेवर आरक्षण नको म्हणून गुहागर नगरपंचायतीत येत आहेत; मात्र एक नागरिक सनसेट पॉईंटचे आरक्षण माझ्या जागेत असेल तर मला हवे आहे, असे सांगण्यासाठी नगरपंचायतीत आले होते; मात्र सदर आरक्षण त्यांच्याच जागेत आहे का याची निश्चित माहिती अधिकारी नसल्याने मिळू शकली नाही हे आमचे दुर्दैव आहे.
--समीर घाणेकर, नगरसेवक