
साटेली-भेडशीतील एकावर विनयभंगप्रकरणी गुन्हा
साटेली-भेडशीतील एकावर
विनयभंगप्रकरणी गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ८ ः विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी साटेली-भेडशी येथील यशवंत लक्ष्मण धर्णे (वय ४५) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे सासरे त्या गावच्या देवस्थान समितीचे पदाधिकारी आहेत. संशयित यशवंत धर्णे हा त्या महिलेच्या सासऱ्यांना सतत शिवीगाळ करीत असल्याने ही बाब संशयिताच्या पत्नीला सांगण्यासाठी ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी संशयित आपल्या घरीच होता. तो संबंधित महिलेच्या अंगावर धावून आला. तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून शिवीगाळही केली. पाठीवर लाथ मारून तिच्या केसांना पकडले व मारहाण केली. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.