वैभववाडीत नगरसेविकेचे
प्रशासनाविरोधात उपोषण

वैभववाडीत नगरसेविकेचे प्रशासनाविरोधात उपोषण

87801
वैभववाडी ः नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले.

वैभववाडीत नगरसेविकेचे
प्रशासनाविरोधात उपोषण
वैभववाडी, ता. ८ ः नगरपंचायतीकडून लेखा परीक्षण अहवाल दाखविला जात नाही, माहिती लपविली जाते, मासिक सभांना पत्रकारांना निमंत्रित केले जात नाही, अशी खंत व्यक्त करीत नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी आजपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रशासन नगरपंचायतीच्या मासिक सभांमध्ये लेखा परीक्षण अहवालाची मागणी करून देखील ते अहवाल दाखवित नाहीत. किती योजनांवर किती खर्च झाला, याबाबतची माहिती देत नाहीत. बाजार कर किती जमा होतो, याचा हिशोब नाही, यांसह विविध मुद्यांवर नगरसेविका जैतापकर यांनी आज सकाळपासून तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. मासिक सभेतील काही ठरावांना आमचा विरोध असतो; परंतु त्यांची नोंद ठरावात केली जात नाही आदी विषयांवर त्यांनी बोट ठेवले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्याशी कुणीही अधिकाऱ्यांनी चर्चा केली नसल्याने उशिरापर्यंत उपोषण सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com