कणकवली रोटरी क्लब आनंद मेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली रोटरी क्लब आनंद मेळा
कणकवली रोटरी क्लब आनंद मेळा

कणकवली रोटरी क्लब आनंद मेळा

sakal_logo
By

kan८९.jpg
८७८१६
कणकवलीः रोटरीच्या आनंद मेळ्याबाबतची माहिती वर्षा बांदेकर यांनी दिली. यावेळी मेघा गांगण, उमा परब, माधवी मुरकर आदी उपस्थित होते.

कणकवली रोटरी क्लब आनंद मेळा
१० ते २२ मार्च दरम्‍यान आयोजन; विविध स्पर्धा, संगीत रजनीचा कार्यक्रम
कणकवली, ता. ९ः रोटरी क्‍लब कणकवलीच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२ मार्च या कालावधीत ‘रोटरी आनंद मेळा’ भरणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धा व संगीत रंजनीचा कार्यक्रम होणार आहे. या मेळ्याचे उद्घाटन शुक्रवार १० रोजी सायंकाळी ६ वाजता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रोटरीचे गव्हर्नर व रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर व आनंद मेळ्याचे इव्हेंट मॅनेजर अॅड. दीपक अंधारी यांनी दिली.
यावेळी उमा परब, माधवी मुरकर, मेघा गांगण, सीताराम उर्फ दादा कुडतरकर, अनिल कर्पे, गुरु पावसकर, रवी परब, नितीन बांदेकर, धनंजय कसवणकर, दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते. दररोज सायंकाळी ६ ते १० यावेळेत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शुक्रवार १७ मार्च रोजी महिलांसाठी ‘मला पैठणी जिंकायची आहे’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. शनिवार १८ मार्च रोजी भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा होईल. ही स्पर्धा युवक गट, खुला गट, युवती गट, खुला गटांत होईल. त्यानंतर डॉग शो, पपी शो, कॅटल शो होईल.
रविवार १९ मार्च रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. ही स्पर्धा बाल व किशोरवयीन गटांसाठी आहे. त्यानंतर ३ ते ८ वयोगटातील मुली व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा होईल. दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.सोमवार २० मार्च रोजी ‘मेरी आवाज सुनो’ ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा बाल किशोर, खुला गटांत होईल. २१ मार्च रोजी स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेनंतर अजित कोष्टी यांचा कॅमेडी शो होणार आहे. गुढीपाडव्यादिवशी २२ रोजी बुधवारी ६ ते १० यावेळेत ऑकेस्ट्राने या मेळयाचा समारोप होईल, अशी माहिती अॅड. दीपक अंधारी यांनी दिली.