Wed, May 31, 2023

कणकवली : मेळावा
कणकवली : मेळावा
Published on : 9 March 2023, 1:20 am
कणकवलीत शनिवारी शिवसेनेचा मेळावा
कणकवली ः शिनसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या सिंधुदुर्ग दौरा नियोजित आहे. यावेळी कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालयात फाटक यांचे स्वागत होणार आहे. त्यामुळे मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता कार्यकर्ता व शिवसैनिकांचा मेळावा, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार आणि पक्षप्रवेश मेळाव्यात होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली जाणार आहे. पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. आग्रे यांनी केले आहे.