Thur, June 8, 2023

कणकवली : वधुवर मेळावा
कणकवली : वधुवर मेळावा
Published on : 9 March 2023, 1:20 am
सावंतवाडीत १२ ला मराठा वधू वर मेळावा
कणकवली ः अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपालिकेसमोर आरपीडी स्कूलमध्ये रविवारी (ता. १२) सकाळी नऊ ते बारा या वेळेत हा मेळावा होणार आहे. यासाठी कोणतीही नोंदणी शुल्क आकारणी होणार नाही. या मेळाव्यात मराठा अविवाहित वधू वर यांचा परिचय करून देणे, घटस्फोटित वधू वर यांचा परिचय, ज्यांनी आपला जोडीदार गमावला आहे; पण पुन्हा संसार करण्याची इच्छा आहे. अशा वधू-वरांसाठीही या मेळाव्यामध्ये परिचय विषय ठेवलेला आहे. या मेळाव्याला वधू वर आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी केले आहे.