हर्डी येथे पारंपरिक पद्धतीने  होलिकोत्सव उत्साहात साजरा

हर्डी येथे पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव उत्साहात साजरा

rat०८२९.txt

बातमी क्र..२९ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat८p९.jpg ः
८७६३९
राजापूर ः होळीवर बनाटी खेळण्याचा सुरू असलेला खेळ.
-rat८p१०.jpg ः
८७६४१
होळी नाचवताना ग्रामस्थ.
--
हर्डीत होळीवरील बनाटी खेळ लक्षवेधी

होलिकोत्सव उत्साहात ; भाविकांची गर्दी

राजापूर, ता. ८ ः शहरानजीकच्या हर्डी येथे पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आबालवृद्धांसह साऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटला. या वेळी होळीवर पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणारा ‘बनाटी’ खेळ पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. होळीसाठी पोफळीच्या झाडाची निवड करून होळी करून ढोलताशाच्या गजरात नाचवण्यात आली. या वेळी देवाच्या नावाचा जयघोष करत आणि फाका देत होळी उत्साहामध्ये खेळवण्यात आली. हर्डी येथील होलिकोत्सवामध्ये होळीवर चढून बनाटीचा खेळ खेळणे हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. यामध्ये ग्रामस्थ होळी नाचवत असताना होळीच्या डांबावर दोन अथवा चार खेळाडू चढून बनाटीचा खेळ खेळतात. होळी नाचवली जात असल्याने बनाटी खेळणाऱ्‍यांना होळीवर उभे राहण्यासाठी एक प्रकारची कसरत करावी लागते. त्यामुळे हे दृश्य फारच मनोहारी असते. बनाटीचा खेळ पाहण्यासाठी आबालवृद्ध महिला-पुरुष यांनी मोठी गर्दी केली होती.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com