हापूस विक्री स्टॉल कोकणातील बागायतदारांना द्या

हापूस विक्री स्टॉल कोकणातील बागायतदारांना द्या

rat०८३०.TXT

बातमी क्र.. ३०

हापूस विक्री स्टॉल बागायतदारांना द्या

कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेची मागणी; रेल्वे स्थानकावर विक्री व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः कोकण रेल्वेच्या स्थानकांवर हापूस आंबाविक्रीसाठी देण्यात येणारे स्टॉल कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकरी किंवा त्यांचे अधिकृत विक्रेते यांनाच द्यावेत. त्यासाठी आवश्यक पुरावा घ्या. ही मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे करण्यात आल्याचे मुकुंद जोशी यांनी सांगितले.
कोकणातील हापूस आंबाविक्रीसाठी कोकण रेल्वेकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले आहेत. वाहतुकीसाठीही प्राधान्य दिल्यामुळे हापूसचे नाव दूरवर पोचण्यास मदत झाली. कोकणातील पाच जिल्हातील भौगोलिक परिस्थितीमध्ये जो तयार होतो तोच अस्सल हापूस आहे, हे भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित केळशी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चार संस्था हापूस जीआयचे प्रोप्रायटर आहेत. त्यामुळे हापूसच्या संबंधात प्रसार, प्रचार, शेतकऱ्‍याला हापूसचे भौगोलिक मानांकन नोंदणी मिळवून देणे ही कामे या संस्था करत आहेत. जीआय मिळाल्यावर कोकणचा शेतकरी खूष झाला आहे. बाजारात हापूसच्या नावाखाली कोकण सोडून इतर प्रदेशात पिकवलेले आंबेही आता काही नाठाळ व्यापारी दलाल विकण्याचा प्रयत्न करतात. त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर स्थानिक शेतकऱ्‍यांना हापूस आंबाविक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या शिवाय रेल्वेमध्येही फिरत्या विक्रेत्यांनाही हापूस विक्रीची परवानगी दिली जाणार आहे. हा निर्णय सुयोग्य व शेतकरी हिताचा आहे.

स्टॉल देण्यापूर्वी खात्री करा...
हे स्टॉल देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती शेतकरी किंवा त्याचा मान्यताप्राप्त प्रतिनिधी आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो शेतकरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील आहे का? याचा पुरावा घ्यावा. शिवाय शेतकऱ्‍याच्या नावे सातबारा असल्याची पाहणी करावी. त्याने भौगोलिक मानांकन, मँगोनेट नोंदणी केली आहे का? याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com