पुण्याच्या अक्षज पाटील बुद्धिबळपटूला सुवर्ण

पुण्याच्या अक्षज पाटील बुद्धिबळपटूला सुवर्ण

rat०९१४.txt

बातमी क्र. १४ (टुडे २ साठी)

पुण्याच्या अक्षज पाटीलला सुवर्ण

खेड, ता. ९ : ‘डेरवण यूथ गेम्स २०२३’ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवातील बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अक्षज पाटीलने ७ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. रौप्यपदक कोल्हापूरच्या शंतनू पाटीलने तर कोल्हापूरच्याच व्यंकटेश खाडे पाटीलने कांस्यपदक मिळविले. मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा मान पद्मश्री वैद्य, रत्नागिरी, सई प्रभूदेसाई रत्नागिरी आणि भूमी कामत, सिंधुदुर्ग या बुद्धिबळपटूंनी मिळविला. या स्पर्धेत ७५ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.

सात फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा दोन दिवस खेळविण्यात आली. आराध्य ठाकूरदेसाई या ९ वर्षांखालील नॉनसीडेड बुद्धिबळपटूने उत्कृष्ट खेळ करीत १८ वर्षांखालील सीडेड खेळाडूचा पराभव करून सर्वांना चकीत केले. सावर्डा येथील महसूल खात्याचे सर्कल ऑफिसर मिलिंद नानल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. चार हून अधिक गुण मिळविणाऱ्या एकूण १८ बुद्धिबळपटूंना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इंटरनॅशनल ऑर्बिटर विवेक सोहोनी यांनी प्रमुख पंच म्हणून कामगिरी बजावली. राज्यस्तरीय स्पर्धेला इतका भरघोस प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या स्पर्धेला ७५ खेळाडूंचा मिळालेला प्रतिसाद ही विशेष बाब आहे, असे सोहोनी यांनी सांगितले. या स्पर्धेतील इतर निकाल खालीलप्रमाणे ः १२ वर्षांखालील गट ः तन्मय शितोळे (सिंधुदुर्ग, सुवर्णपदक), अर्णव चव्हाण (रत्नागिरी, रौप्यपदक), साई देव (पुणे, कांस्यपदक), तर ९ वर्षांखालील गट ः राघव पाध्ये (रत्नागिरी, सुवर्णपदक), निधी गवस (सिंधुदुर्ग, रौप्यपदक), श्लोक कोलगे (रत्नागिरी, कांस्यपदक).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com