भोसले नॉलेज सिटीत
महिला दिन उत्साहात

भोसले नॉलेज सिटीत महिला दिन उत्साहात

८७८९७

भोसले नॉलेज सिटीत
महिला दिन उत्साहात
सावंतवाडी, ता. ९ ः येथील भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, उपाध्यक्षा सरोज देसाई, सदस्या सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपाध्यक्षा देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेऊन भावी आयुष्यात स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. अध्यक्षा सावंत-भोसले यांनी आज आपण जीवनात जे काही आहे ते फक्त आईमुळेच असून प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आईचे स्थान हे एक मार्गदर्शक, शिक्षिका व मैत्रीणीप्रमाणे असल्याचे सांगितले. सुनेत्रा फाटक यांनी स्त्रीकडे एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची कुशलता असल्याचे अधोरेखित केले. यावेळी संस्थेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला स्टाफ तसेच विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन प्रा. रश्मी महाबळ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com