Sat, June 3, 2023

कणकवली :मृतदेह सापडला
कणकवली :मृतदेह सापडला
Published on : 9 March 2023, 1:18 am
नाटळ येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह
कणकवली ः महिनाभरापासून बेपत्ता असलेले हरकुळ खुर्द येथील मधुकर नारायण मलये (वय ७५) यांचा मृतदेह आज सकाळी नाटळ येथील गडनदी पात्राच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला. अंगावरील कपड्यामुळे श्री. मसये यांची ओळख पटली आहे. नाटळ येथील नदीपात्रानजीक मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याची चर्चा होती. याबाबतची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अनिल जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बेपत्ता मलये यांच्या कुटुंबीयांनाही बोलविले. त्यांनी मृतदेह मधुकर मलये यांचा तो मृतदेह असल्याचे सांगितले केले.