
विदर्भाच्या धर्तीवर कोकणातील नुकसानाची हवी पाहणी
rat९p२५.jpg -KOP२३L८७९४३
राजापूर ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देताना आमदार राजन साळवी आणि शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभू
कोकणातील नुकसानाची
विदर्भाच्या धर्तीवर हवी पाहणी
आमदार साळवी ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये बदल झाला असून तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम आंबा-काजू पिकावर दिसू लागला आहे. त्यामुळे विदर्भातील निकषानुसार कोकणातही आंबा, काजू व नारळ फळ झाडांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी अन् पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आणि राजापूरचे आमदार राजन साळवी आणि शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आमदार साळवी यांच्यासह शिवसेना पक्ष प्रतोद प्रभू, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांच्याही स्वाक्षऱ्या असून त्यांनीही कोकणामध्ये अवकाळी पाऊस आणि वाढलेल्या तापमानामध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानाचे सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची उष्णता वाढली असून त्याच्या जोडीला वेगाचे वारेही काही काळ वाहत आहे. याचा प्रतिकूल परिणाम होवून कोकणातील उत्पन्नाचे महत्वाचे फळ असलेल्या आंबा, काजू पिकाला बसला आहे. विदर्भातील काही शेतकर्यांना प्रतिकूल हवामानाचा फटका बसून त्यांचे नुकसान झाले आहे. विदर्भामध्ये झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण अन् पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू झाले आहे. त्याप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा, काजू, नारळीसह अन्य पिकांच्या झालेया नुकसानीचे सर्व्हेक्षण अन् पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार साळवी आणि सहकारी यांनी शासनाकडे केली आहे.