बचतगटांच्या विकासासाठी प्रयत्नशील

बचतगटांच्या विकासासाठी प्रयत्नशील

swt921.jpg
87959
कुडाळः जागतिक महिलादिनानिमित्त शिवसेना व हरितसिंधू संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी वर्षा कुडाळकर व पदाधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)

बचतगटांच्या विकासासाठी प्रयत्नशील
वर्षा कुडाळकरः कुडाळात शिवसेनेतर्फे महिलादिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल, यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी जागतिक महिलादिन कार्यक्रमात केले.
कुडाळ तालुका शिवसेना व हरित सिंधू सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील शाखा कार्यालयात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा जिल्हा महिला आघाडीप्रमुख कुडाळकर, ज्येष्ठ महिला सुनीता शेंबडकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी तालुका प्रमुख बंटी तुळसकर, नीलम शिंदे, अनघा रांगणेकर, नीलम शिंदे, लुड्डीन फर्नांडिस, गीता नाटेकर, नीलम चव्हाण, जीया शेंबडकर, रिया कांबळी, वैष्णवी राणे, तारादेवी गडकरी, प्रणाली देवळी, वंदना पाटकर, अमृता मेस्त्री, समृद्धी मेस्त्री, तन्वी मेस्त्री, स्नेहा पाटकर, ममता झोरे, सौरवी चव्हाण, प्रतीक्षा परब, आराध्या करलकर, पल्लवी कदम, आयुशी परब, सिद्धी शिरसाट, स्वप्नाली राणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वर्षा कुडाळकर यांनी, प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेयमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगत शालेयमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी आला असून विविध विकासकामे सुरू असल्याचे स्पष्ट केले
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यात पशुसखी, अंगणवाडी सेविका,  मदतनीस, बचतगटातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या आदींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सानिका मुंडये, रिया कांबळे सौरवी, सुनीता वरवडेकर, प्रतिभा परब, पल्लवी कदम, स्वप्नाली राणे, वैष्णवी राणे या सत्कारमूर्तींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने समर्थ फाउंडेशनतर्फे मधुमेह व नशामुक्ती मार्गदर्शन सचिन राणे (सावंतवाडी), नारायण देसाई (वजराट) यांनी केले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात बिस्कीट स्पर्धेत प्रतीक्षा परब, तन्वी मेस्त्री, प्रणाली देवळी, मेणबत्ती स्पर्धा, प्रतीक्षा परब, सौरवी चव्हाण, रिया कांबळी, चाळणीत माचिस कांडी टाकणेमध्ये सानिका मुंडये, वैष्णवी राणे, आराध्या करलकर, उखाणा स्पर्धेत सुनीता शेगाटकर, समृद्धी मेस्त्री यांनी यश संपादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com