संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो- rat9p9.jpg-KOP23L87852 पाली ः डी. जे. सामंत महाविद्यालयातील विद्यार्थी पाली बसस्थानक येथे पथनाट्य सादर करताना.

डी. जे. सामंत महाविद्यालयात
जागतिक महिला दिन साजरा
रत्नागिरी ः पाली येथील डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात दिपप्रज्वलन करून व थोर, कर्तबगार यशस्वी महिलांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम महाविद्यालय ते पाली बसस्थानक अशी शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या यशस्वी महिलांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्यावर आधारित पोवाड्याच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महिला सबलीकरण या विषयावर पाली बसस्थानक येथे जनजागृतीपर पथनाट्य केले. या उपक्रमात महाविद्यालयातील सानिका संसारे, आकांशा गावडे, नयन कांबळे, वैष्णवी धुमाळी, सानिका सुर्वे, बिंदिया जाधव, अंकिता मोहिते, अंकिता झोरे, आदित्य शिंदे, ऋतिकेश धाडवे, आदेश कांबळे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे, वाहतूक नियंत्रक करुणा कदम, महिला विकास कक्ष विभाग प्रमुख प्रा. वीणा शिंदे, ग्रंथपाल मंजिरी कुलकर्णी, प्रा. सोनाली कुरतडकर,प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रा. भूषण पाध्ये, प्रा. सुभाष घडशी व इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------

फोटो- rat9p13.jpg - KOP23L87861 रत्नागिरी : शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ''सृजन'' हस्तलिखिताचे प्रकाशन करताना मान्यवर.

शिर्के प्रशालेत मराठी भाषा, विज्ञान दिन साजरा
रत्नागिरी : येथील रा. भा. शिर्के कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. विज्ञान दिनानिमित्ताने
अकरावी विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग, मॉडेल, भित्तिपत्रके सादर केली. वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिक आणि वैज्ञानिकांची माहिती असलेले सृजन नावाचे हस्तलिखित तयार केले. त्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच वादविवाद स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला प्रशालेच्या माजी शिक्षिका एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती जाधव यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

कर्नाटकात थांबे दिले
संगमेश्वर रोडचा प्रश्न कायम
संगमेश्वर ः कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्‍या नेत्रावती एक्सप्रेसला कर्नाटकमध्येच भटकळ स्थानकावर आजपासून (ता. 9) प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गावर मागील काही वर्षांपासून नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर रोड थांब्यासाठी आंदोलने करूनही रेल्वेने थांबा मंजूर केलेला नाही. यामुळे एकाच मार्गावरील दोन राज्यांमध्ये कोकण रेल्वेचा दुजाभाव स्पष्ट होत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेसला भटकळ स्थानकावर थांबा दिला आहे. परतीच्या प्रवासात तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावताना नेत्रावती एक्सप्रेस भटकळला थांबेल. पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे थांबे देण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड, राजापूर रोड, वैभववाडी तसेच खेड स्थानकावर आणखी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावेत, अशी विविध संघटनांकडून वारंवार मागणी केली जात आहे.

-------
ओळी
- rat9p8.jpg- KOP23L87851
सावर्डे ः डॉक्टर अक्षता शेंबेकर मुलींनी मार्गदर्शन करताना.

सावर्डे महाविद्यालयात महिला दिन साजरा

सावर्डे ः ताण-तणाव आणि संघर्ष यातून महिला मुक्त होण्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. त्यासाठी योग, ध्यान, आहार या त्रिसूत्रीचे संतुलन ठेवणे तसे योग्य नियोजन केले पाहिजे, असे मत डॉ. अक्षता शेंबेकर यांनी केले. महिला दिनानिमित्त सावर्डे कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्त्रियांना मिळालेले स्वतंत्र्य अजूनही त्यांच्या पर्यंत पोहचले नाही. आपल्याला फक्त फेसबुक व इनस्ट ग्राम वरतीच दिसते. पण हे वास्तववादी खर स्वातंत्र्य नाही, तर आभासी आहे याची जाणीव ठेवा. स्त्री-पुरुष असा भेद भाव न करता तिला माणूस म्हणून बघावे, असं मत डॉ शेंबेकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तानाजी यांनी तर सूत्रसंचलनं प्रा. दीप्ती शेंबेकर यांनी केले तर आभार प्रा. मेधा सावर्डेकर यांनी मानले.