उद्योजिका निता सुर्वेंचा सत्कार

उद्योजिका निता सुर्वेंचा सत्कार

rat०९२५.txt

बातमी क्र. २५ (पान २ साठी)

फोटो-
rat९p१८.jpg-
८७९३०
रत्नागिरी - रत्नागिरी तालुका भंडारी महिलांच्या वतीने निता सुधाकर सुर्वे यांचा यशस्वी उद्योजीका म्हणुन सत्कार करण्यात आला.
-----------

उद्योजिका निता सुर्वें यांचा सत्कार

रत्नागिरी, ता. ०९ : जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी महिलांच्या वतीने सामान्य कुटुंबातील असामान्य नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला . कुवारबाव येथील निता सुधाकर सुर्वे यांचा यशस्वी उद्योजीका म्हणुन शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
निता सुर्वे यांचे माहेरचे नाव शोभा गणपत शिरोडकर असुन राजापुर तालुक्यातील दोनिवडे येथे त्यांचा जन्म झाला. दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कष्टाकडे त्यांचा कल होता. १९८३ साली कुवारबाव येथील भंडारी कुटुंबातील सुधाकर विठोबा सुर्वे यांच्याशी विवाह झाला. सुधाकर सुर्वे त्यावेळी आंबा आणि काजू बी चा किरकोळ विक्रीचा व्यवसाय करीत होते. लग्नानंतर सौ. निता त्यांना व्यवसायात मदत करु लागल्या. कष्ट, जिद्द प्रामाणिकपणामुळे शे-पाचशेंचा व्यवहार हजारोपर्यंत आणि पुढे कोटीत गेला. नातेकाईकांपासुन सगळ्यांचीच चांगली साथ मिळाल्यामुळे ३७ वर्षात मागे पहावे लागले नाही. मुलगा आणि मुलगी दोन्ही आता व्यवसायात मदत करतात. मुलांच्या मदतीने ४००० आंब्यांच्या कलमांची लागवड झाली. अनेक बरेवाईट प्रसंग वाट्याला आले. परंतु न डगमगता धीराने तोंड देत मार्गक्रमण करीत आलो आहोत त्यात परमेश्वराचे भरभरुन पाठबळ मिळाले असल्याचे त्या सांगतात. यावेळी माजी नगरसेविका अस्मिता चवंडे, मा. नगरसेविका संपदा तळेकर, विजया घुडे, सुवर्णा शिरधनकर, अमृता मायनाक, तनया शिवलकर, उर्मिला तळेकर, वैदेही खडपे, रंजना विलणकर, राजीव किर, दिलीप भाटकर, अशोक मायनाक, आर के विलणकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com