
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
- rat९p२६.jpg- KOP२३L८७९४४ श्री देव लक्ष्मीकेशव
टाकळेवाडी येथे उद्या शिमगोत्सव
रत्नागिरी : फणसोप, टाकळेवाडी येथील शिमगोत्सवाला शनिवारपासून (ता. ११) प्रारंभ होत आहे. शनिवारी रात्री १२ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळाचे अध्यक्ष जगदीश साळवी यांनी केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता श्री देव लक्ष्मीकेशव पालखी फणसोप येथील मंदिरातून टाकळेवाडी गावातील घरे घेण्यासाठी निघणार आहे. दिवसभर घरे घेऊन झाल्यावर पालखी दत्त मंदिर येथे भाविकांना दर्शनासाठी स्थानापन्न होणार आहे. ८ ते ९ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम रात्री १० ते ११ या वेळेत होणार आहे. रात्री १२ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक झाल्यानंतर पिलणकर कुटुंबांच्या मुळ घरामध्ये पालखीची आरती, गाऱ्हाणे होऊन पालखी फणसोप येथील देवळात जाण्यासाठी निघेल. भाविकांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
- rat९p२४.jpg- अॅड. महेंद्र मांडवकKOP२३L८७९४२
भाजपा कायदा आघाडी प्रमुखपदी
अॅड. महेंद्र मांडवकर यांची निवड
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीच्या कायदा आघाडी प्रमुख म्हणून अॅड. महेंद्र वसंत मांडवकर यांची निवड जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी नेमणूक केली. अॅड. मांडवकर हे २००८ सालापासून वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२० पासून भाजपाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सचिव म्हणून काम करताहेत. रत्नागिरी वकील बार असोसिएशनचे सह सचिव म्हणून काम पाहिले आहे. २००० सालापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध जबाबदाऱ्या घेतल्या. नुकत्याच झालेल्या युथ समिट या जिल्हास्तरीय संमेलनाचे सहसचिव म्हणून काम पाहिले. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे २०१४ सालापासून सदस्य व लायन्सच्या विविध उपक्रमात सहभागी होतात. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य, कॉलेज जीवनात एनएसएसच्या शिबिरांत भाग घेतला. निरीक्षणगृहाच्या कार्यकारिणीचे सदस्य असून रत्नमित्र फाउंडेशन संस्थेची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबवतात.
सोबत फोटो आहे.
- rat९p२३.jpg- KOP२३L८७९४१ रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात महिला पालकांसाठी महिला दिनी आयोजित स्पर्धांचे उद्घाटन करताना सौ. संगीता वणजू. सोबत प्रमोदिनी शेट्ये, मनाली शेट्ये, मीरा दळी, सपना रेडीज, विनायक हातखंबकर, दादा कदम आदी.
बियाणी बाल मंदिरात महिला दिन साजरा
रत्नागिरी : पू. गो. भ. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरामध्ये महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदिनी शेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. संगीता सुनील वणजू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत ५० महिला पालक, शिक्षिका, सौ. संगीता वणजु, सौ. मनाली शेट्ये, सौ. मीरा दळी, सौ. सपना रेडीज सहभागी झाल्या. गट करणे, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, बटाटा शर्यत, फुगे फोडणे अशा विविध खेळ खेळले. यात प्रथम सौ. प्रियांका कांबळे, द्वितीय सहशिक्षिका आयुषी विचारे, तृतीय सौ. मनाली शेट्ये यांनी यश मिळवले. त्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. काही महिलांना प्रश्न विचारण्यात आले. बरोबर उत्तर देणाऱ्या महिलांना बक्षीस देऊन गौरवले. बक्षीस वितरणाला पाहुण्यांसह शालेय समितीचे प्रबंधक विनायक हातखंबकर, श्रीकृष्ण दळी, संजय चव्हाण, राजेंद्र तथा दादा कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्रीकृष्ण दळी यांनी केले. सहभागी सर्व महिला पालकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले. धनश्री मुसळे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पालक प्रमोद तेरेदेसाई व उमेश जोशी, ओंकार पुसाळकर यांचे सहकार्य लाभले.
आरटीई प्रवेशासाठी १७ पर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी ः आरटीई प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील ९२ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये विविध गटांसाठी जिल्ह्यातील ९२९ जागांवर मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.