
संक्षिप्त
- rat9p21.jpg-KOP23L87934 राजापूर ः महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.
महिला दिनी महिलांचा प्रशालेतर्फे सत्कार
राजापूर ः तालुक्यातील सोलगाव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा सोलगाव नं. २ मध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून संगीता नवाळे आणि विजया नाखरेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, हळदी कुंकू यांसारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, प्रशाळेचे मुख्याध्यापक दिपक धामापूरकर, समिती सदस्या संगिता नवाळे, पुष्पमाला नांगरेकर, विजया नाखरेकर, ज्योती नाखरेकर, मनस्वी नाखरेकर आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मगदूम यांनी केले.
‘स्वच्छता क्विन’ च्या विजेत्या हर्षदा खानविलकर
राजापूर ः महिला दिनानिमित्त राजापूर नगर पालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि दिन दयाळ अंत्योदय विभागातर्फे महिलांसाठी विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी क्रीडांगणावर रंगलेल्या या स्पर्धांमध्ये मोठ्यासंख्येने महिलांनी सहभागी झाल्या. ‘स्वच्छता क्विन’ या प्रश्नमंजुषा विशेष कार्यक्रमात हर्षदा खानविलकर यांनी विजय मिळवला. राजीव गांधी क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी पालिकेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सोनाली मांडवे, प्राची शेलार, फिरोजा मुल्ला यांनी यश पटकाविले. फनी गेम्समध्ये संध्या पंडीत, उन्नती मंचेकर, नेहा खानविलकर यांनी तर, संगीत खुर्ची स्पर्धेत शुभांगी सोलगावकर, नेहा जावकर, आकांक्षा खटावकर यांनी यश मिळवले. सर्व विजेत्यांना रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. लहान मुलींमध्ये रिया जानस्कर, वैष्णवी पाटील व वैभवी भामद्रे यांना विशेष पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रदिप निकम, अशोक दुदम, अविनाश नाईक यांनी काम पाहिले.