वेंगुर्लेत ११ रणरागिणींचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत ११ रणरागिणींचा सत्कार
वेंगुर्लेत ११ रणरागिणींचा सत्कार

वेंगुर्लेत ११ रणरागिणींचा सत्कार

sakal_logo
By

88121
वेंगुर्ले ः भाजप महिला मोर्चाच्यावतीने तालुक्यातील ११ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.


वेंगुर्लेत ११ रणरागिणींचा सत्कार

महिलादिनाचे औचित्य; भाजप महिला मोर्चाचा पुढाकार

वेंगुर्ले, ता. ९ ः जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील ११ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महिला मोर्चाच्या वतीने भाजपा तालुका कार्यालयात करण्यात आला. स्वत:च्या कार्यकर्तृत्वावर समाजात वेगळे स्थान निर्माण करत समस्त महिला वर्गात एक आदर्श निर्माण केलेल्या अशा या महिलांचा सन्मान भाजप महिला मोर्चाच्यावतीने सन्मानपत्र, शाल व पुष्प देऊन करण्यात आला.
यावेळी महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले यांनी सर्वांचे स्वागत केले. महिलादिनाच्या शुभेच्छा देताना महिलांनी देशाच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर शत्रूशी लढण्यातही आता महिला भगिनी आघाडीवर आहे. घर सांभाळणारी महिला जसा कुटुंबाचा आधार असते, तसे आज ती देशाचाही आधार बनली आहे. त्यामुळेच देशाचा अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी आज निर्मला सीतारामण यांच्या रुपात एक महिला समर्थपणे सांभाळत असल्याचे त्या म्हणाल्या.
कर्तुत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या प्राची मणचेकर (उभादांडा-मानसिश्वर), शिवणक्लास घेऊन घराचा चरितार्थ चालवणाऱ्या रागिणी परुळेकर (परुळेकर दत्त मंदिर), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारची कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या प्रणाली अंधारी (गाडीअड्डा), साईमंगल व साईदरबार हॉलच्या संचालिका तसेच कॅटरींग व्यावसायिक अक्षता मांजरेकर (सुंदरभाटले), वेंगुर्ले तालुका गिरणी मालक संघाच्या अध्यक्षा व महिला उद्योजिका आकांक्षा परब (देऊळवाडी), काजू कारखानदार व उद्योजिका दुर्वा माडकर (दाभोलीनाका), लहान वयात टेलरिंग व्यवसाय करून कुटुंब सांभाळणाऱ्या संगीता नाईक (राऊळवाडा), पतीच्या निधनानंतर स्वत:च्या पायावर उभी राहून स्टॉलच्या माध्यमातून मुलांचे पालन पोषण करणाऱ्या सायली परब (सातेरी मंदिर), योगशिक्षिका व मेडिकल योग थेरीपिस्ट साक्षी बोवलेकर (हॉस्पिटलनाका), स्फूर्ती गृोद्योगामार्फत विविध प्रकारचे मसाले व पदार्थ बनविणाऱ्या स्मिता होडावडेकर (मारुती मंदिर), कापड दुकानदार व महिलांचे ड्रेसमटेरीयल बनविणाऱ्या स्मिता कोयंडे (गिरपवाडा) आदी महिला उद्योजिकांचा सन्मान झाला.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, शहराध्यक्षा प्रार्थना हळदणकर, तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर, नगरसेविका श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, पूनम जाधव, अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार, रसिका मठकर, मानसी परब, सरिता परब, मीनाक्षी माडकर, अंकिता देसाई, परबवाडा ग्रामपंचायत सदस्या अरुणा गवंडे आदी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन प्रार्थना हळदणकर यांनी केले.