महावितरणचा अभियंता लाच घेताना जाळ्यात

महावितरणचा अभियंता लाच घेताना जाळ्यात

पान १ साठी


महावितरणचा उपअभियंता
लाच घेताना जाळ्यात
दापोलीत सापळा; ८० हजारांची मागणी, ५० हजारांवर तडजोड
दाभोळ, ता. ९ : महावितरणचे दापोली येथील उपकार्यकारी अभियंता यांना ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दापोली येथे केली. अमोल मनोहर विंचूरकर (रा. दापोली) असे लाचखोर उपकार्यकारी अभियंत्यांचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना त्यांचे पक्षकार यांनी केलेल्या प्लॉटिंगवर बसवण्यात येणाऱ्या ११० केव्ही वीज भार व ट्रान्स्फॉर्मर या कामाचे एस्टिमेट दिले होते. त्याला मंजुरी देऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी यातील उपकार्यकारी अभियंता अमोल विंचूकर यांनी तक्रारदार यांच्याकडून ८० हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची शहानिशा झाल्यानंतर आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. यामध्ये मागणी केलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. अमोल विंचूरकर यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सनिल लोखंडे, उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, पोलिस हवालदार विशाल नलावडे, शिपाई हेमंत पवार, प्रशांत कांबळे आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com