
मंडणगडमधील अनधिकृत ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक
rat९p३५.jpg -३L८८०००
मंडणगड: तालुक्यातील तुळशी दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था व उडणारी धूळ
मंडणगडात क्षमतेपेक्षा जास्त बॉक्साईट वाहतूक
--
कारवाईची मागणी; तहसीलदारांचे खनिकर्म, परिवहनकडे बोट
मंडणगड,ता.९ ः मागील सुमारे सहा महिन्यांपासून मल्टी एक्सल वाहनांच्या सहाय्याने तालुक्यातून बॉक्साईट खनिजाची अनधिकृत अवजड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीविरोधात तहसीलदार मंडणगड यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ग्रामस्थानी वेळोवेळी निवेदने सादर केली, आंदोलनाचे इशारे देण्यात आले, आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार यांनी अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट करत जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना स्वतः पत्रव्यवहार केला आहे. तालुक्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे नमूद करत कार्यवाहीची मागणी केली आहे.
यातील तक्रारदाराना या पत्राची प्रत देण्यात आली आहे, या पत्रातील माहितीनुसार, मंडणगड तालुका पत्रकार संघाने तालुक्यात सुरु असलेली विना परवाना अवजड वाहतूक तातडीने थांबविणे बाबत विनंती केली आहे, तसेच नोव्हेंबर २०२२ पासून मंडणगड तालुक्यातील चिंचघर ते लाटवण या मार्गावरील चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय मार्गावरील सुमारे ६० किमी अंतराचा वापर ओव्हरलोड मल्टी एक्सल वाहनांचे वाहतूक करिता राजरोसपणे सुरु आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे साईडपट्टीसह रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. तालुक्यात सुरु असलेली विनापरवाना वाहतूक बंद न केल्यास वाहतुकीने होणाऱ्या नादुरुस्त रस्त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. तरी अनधिकृत अवजड वाहतुकी संदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी. या विनापरवाना वाहतुकीवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन हातात घेणार असल्याबाबत या कार्यालयास निवेदनाद्वारे कळवले आहे.
वारंवार तहसील कार्यालयात आंदोलनाचे निवेदन देत आहेत. तालुक्यात या विषयामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या विषयकामी ओव्हरलोड बाबत कारवाई करणेबाबत या कार्यालयाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना वारंवार कळवण्यात आलेले आहे. तथापि त्यांचेकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.
चौकट
निर्देश देण्याची मागणी
पोलिस विभागालाही कार्यालयाकडून वारंवार कळवण्यात आलेले आहे. तरी आशापुरा कंपनीकडून होणाऱ्या वाहतुकीबाबत योग्य ते निर्देश कंपनी व्यवस्थापनास आपणाकडून कळविण्यास विनंती आहे, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांना आपल्या कार्यालयामार्फत योग्य ती सूचना देण्यात यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्राची प्रत उपविभागीय अधिकारी, उपविभाग दापोली, यांना देण्यात आली आहे.