स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात महिला दिन
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात महिला दिन

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात महिला दिन

sakal_logo
By

rat०९३२.txt

बातमी क्र. ३२ (पान ५ साठी)
सोबत फोटो आहे.
- rat९p२८.jpg-
८७९४९
रत्नागिरी : सेवा सामाजिक विकास संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलताना विद्यार्थिनी.

सेवा सामाजिक विकास संस्थेत महिला दिन

रत्नागिरी : सेवा सामाजिक विकास संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयबीपीएस व सरळ सेवा भरती पूर्वतयारी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महिला दिनाचे नियोजन केले होते. विश्वास लटके याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राहुल नाडे या विद्यार्थ्याने प्रास्ताविक केले. श्रृती सकपाळ, सानिका जाधव, माधुरी सरकटे, सोनाली या विद्यार्थिनींनी समूहगीत सादर केले. प्रज्वली चव्हाण हिने महिलांच्या सुरक्षेबाबत मनोगत व्यक्त केले. श्वेता जाधव हिने भ्रूण हत्येवर आधारीत स्वरचित कविता सादर केली. पौर्णिमा व्हटकर हिने स्पर्धा परीक्षेत विद्यार्थिनींचा सहभागावर मनोगत व्यक्त केले. अयगिरी नंदिनी, उंच माझा झोका, बेटिया ही सामूहिक गीते पूनम जाधव, पौर्णिमा व्हटकर, सानिका मोहिते, दीक्षा पवार, शामल पवार यांनी सादर केली. शिक्षिका आरोही सुर्वे, अनिता हाके, भक्ती वर्वडकर, पौर्णिमा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.