दिशा समितीची तहकुब बैठक आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिशा समितीची तहकुब बैठक आज
दिशा समितीची तहकुब बैठक आज

दिशा समितीची तहकुब बैठक आज

sakal_logo
By

दिशा समितीची तहकुब झालेली बैठक आज

अनुपस्थित अधिकाऱ्यांची होणार कानउघाडणी ; योजनांचा आढावा
रत्नागिरी, ता. ०९ : विविध खात्याचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नोव्हेंबरमध्ये तहकुब झालेली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक उद्या (ता. १०) सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तशा नोटिसा सुमारे पंचवीस खातेप्रमुखांना बजावून बैठकीला हजर राहण्यास सागितले आहे. खासदार विनायक राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत गैरजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) रत्नागिरी सन्माननीय सदस्यांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नोटीस बजावली आहे. दिशा समितीची बैठक १५ नोव्हेंबर २०२२ ला घेण्यात आली होती. कोरमअभावी ही बैठक तहकुब करण्यात आली होती. दिशा बैठकीसाठी अधिकारी वर्ष अनुपस्थित राहिल्याने ही समितीची बैठक तहकुब झाली होती. जलसंधारण विभागापासून ते कोकण आयुक्त, प्रशासक आणि सर्व खात्यांचे खातेप्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नोटीसाबरोबर जोडपत्रात उल्लेख असलेल्या शासनाच्या सुमारे ४२ योजनांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक तहकुब करण्यात आली होती. त्या अधिकाऱ्यांची अध्यक्ष कानउघाडणी करणार काय, याकडे लक्ष आहे.