वातीमुळे गाऊन पेटून सावंतवा़डीत महिलेचा मृत्यू

वातीमुळे गाऊन पेटून सावंतवा़डीत महिलेचा मृत्यू

वातीमुळे गाऊन पेटून
सावंतवा़डीत महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः देवघरातील समईच्या वातीचा स्पर्श होऊन गाऊनने पेट घेतल्याने शहरातील झिरंग येथील वयोवृद्ध महिला गंभीररित्या भाजून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुगंधा नारायण वंजारी (वय ९०) असे तिचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मुलगा प्रशांत वंजारी यांनी येथील पोलिसात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत सुगंधा वंजारी वयोवृद्ध असल्याने गेली काही वर्षे जागीच होत्या. दुपारी मुलगा प्रशांत हा औषध आणण्यासाठी बाजारात गेला असता दीड ते पावणेतीनच्या दरम्यान जवळ असलेल्या देवाकडील समईच्या वातीची आग तिच्या अंगावरील कपड्यांना लागली. यात त्या गंभीररित्या भाजल्या. मुलगा प्रशांत हा घरी आल्यानंतर आई भाजलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तत्काळ त्यांना उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत मुलगा प्रशांत याने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक अमित गोते, गुरुनाथ भागवत यांनी पंचनामा केला. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com