-

-

आयशर ५५१ ट्रॅक्टर
बाजारात दाखल
पुणे, ता. ९ ः कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आयशर ५५१ बाजारात दाखल झाला आहे. तांत्रिक आणि शक्तीचा संगम असलेला हा ट्रॅक्टर ४९ एच पी श्रेणीतील दमदार ट्रॅक्टर आहे. जलद गतीने काम करणारा हा ट्रॅक्टर इंधनाची बचत करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
ऑल इन वन प्रकारातील हा ट्रॅक्टर शेतीबरोबरच ट्रॉली आणि व्यावसायिक कामासाठी उपयोगात आणता येतो. आयशर ५५१ मजबूत आणि टिकाऊ असून, अनेक प्रकारच्या सुविधा यात देण्यात आल्या आहेत. १० स्पीड कॉम्बिटर, स्मार्ट पीटीओ मोड, एचडी एक्सेल आदी उत्तम आणि उन्नत उपकरणे जोडली आहेत. विशेष म्हणजे ड्रोजर, हार्वेस्टर, रिव्हर्सेबल, एमबी प्लाऊ, आदी उपकरणे ट्रॅक्टरला जोडता येणार आहेत. अगदी छोट्या कामांपासून मोठी अवजड कामे करणारा आयशर ५५१ हा सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी उत्तम, किफायतशीर आणि परवडणारा पर्याय आहे, असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com