Fri, June 9, 2023

विजापुरातील कामगार वैभववाडीतून बेपत्ता
विजापुरातील कामगार वैभववाडीतून बेपत्ता
Published on : 9 March 2023, 2:52 am
swt929.jpg
88027
गोपी चव्हाण
विजापुरातील कामगार
वैभववाडीतून बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ः विजापूर येथील कामगार गोपी थायरू चव्हाण हा येथे राहत असलेल्या घरातून काल (ता. 8) बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याची पत्नी कविता चव्हाण हिने पोलिसांत दिली. विजापूर येथील चव्हाण दाम्पत्य कामासाठी वैभववाडीत आहे. येथील गोपाळनगर येथे ते राहतात. गोपी हा काल सायकांळी 4 वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला. त्यानंतर रात्री आणि आज दिवसभर त्याचा शोध घेतल्यानंतर सायकांळी उशिरा बेपत्ताची तक्रार पत्नी कविता हिने पोलिसांत दिली.