देवगडमध्ये घरोघरी शिमगोत्सवाची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये घरोघरी 
शिमगोत्सवाची धूम
देवगडमध्ये घरोघरी शिमगोत्सवाची धूम

देवगडमध्ये घरोघरी शिमगोत्सवाची धूम

sakal_logo
By

88039
जामसंडे ः येथील श्री दिर्बादेवी मंदिरात शिमगोत्सवानिमित्त घुमट नृत्य सादर करण्यात आले. (छायाचित्र ः वैभव केळकर)

देवगडमध्ये घरोघरी
शिमगोत्सवाची धूम
देवगड ः तालुक्यात ठिकठिकाणी शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे. विविध देवतांच्या मंदिरात प्रथेप्रमाणे उत्सव साजरा होत आहे. ग्रामीण भागात घरोघरी शिमग्याचे खेळ फिरताना दिसत आहेत. देवतांची निशाणे फिरविली जात आहेत. निशाणासोबत ग्रामस्थांचा लवाजमा असल्याचे चित्र आहे. मंदिरात पारंपरिक पध्दतीने घुमट नृत्य सादर करण्यात आले. ग्रामीण भागात काही ठिकाणी देव तरंग होळीच्या मांडावर नेण्यात आले. त्या ठिकाणी रात्रभर विविध कार्यक्रम साजरे होताना दिसत आहेत. यासाठी चाकरमान्यांची मोठी उपस्थिती असते. गावात घरोघरी देवतांचे निशाण फिरविले जात आहे. बच्चे कंपनी विविध रुपे घेऊन छबय मागण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. प्रथेनुसार मंदिरात कार्यक्रम सादर झाल्यानंतर घरोघरी किंवा ठरलेल्या ठिकाणी कार्यक्रम सादर केले जात आहेत. सध्या उन्हाळा असल्याने तसेच दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने सकाळच्यावेळी शाळा असते. त्यामुळे सायंकाळच्यावेळी विविध रुपे घेऊन मुले गावात फिरताना दिसतात. मंदिरात धार्मिक प्रथेप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. होळीच्या मांडावर रात्रीचे कार्यक्रम सुरू असतात.
....................
88038
पिंगुळी ः श्री देव रवळनाथ निशाणाचे पूजन करण्यात आले (छायाचित्र ः अजय सावंत)

रवळनाथ निशाणाचे पिंगुळीमध्ये पूजन
कुडाळ ः पिंगुळीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचे निशाण आज घरोघरी आणून यथोचित पूजन करण्यात आले.
पिंगुळी गावचा शिमगोत्सव पाच दिवसांचा असतो. सुमारे १७ वाड्यांचा समावेश असणारा हा गाव आहे. आज घरोघरी ‘श्रीं’चे निशाण घेऊन त्यांचे ढोलताशाच्या गजरात वाजतगाजत स्वागत व पूजन करण्यात आले.