आर्थिक फसवणूकप्रकरणी कुडाळात दोघांवर गुन्हा

आर्थिक फसवणूकप्रकरणी कुडाळात दोघांवर गुन्हा

आर्थिक फसवणूकप्रकरणी
कुडाळात दोघांवर गुन्हा
कुडाळ, ता. ९ ः खासगी कंपनीच्या कामासाठी खडीचे टेंडर देतो, असे माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांना सांगून त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेणाऱ्या सचिन परदेशी उर्फ सचिन पाटील (रा. पनवेल) व मंदार लक्ष्मण गुडगेकर (रा. पनवेल) यांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत येथील पोलिसांत सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित खासगी कंपनीकडे खडीचे टेंडर भरण्यासाठी पनवेल येथील नगरसेवक सचिन परदेशी उर्फ सचिन पाटील यांनी फोन केला होता. यासंदर्भात संजय पडते यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले होते. पडते यांना संपर्क साधला असता त्यांनी पाटील याच्याशी आपले बोलणे झाले. त्यांनी सांगितल्यावरून पुढची बोलणी केली. या टेंडरसाठी 2 लाख 50 हजार रुपये भरावे लागतील, असे त्यांनी सांगितले त्यावेळी एवढे पैसे माझ्याजवळ सध्या नाही, असे सांगितल्यानंतर 1 लाख रुपये भरा, त्यानंतर पुढची प्रक्रिया करू, असे सांगितले. यामध्ये मंदार गुडगेकर हे सुद्धा होते. गुडगेकर यांच्या खात्यावर 1 लाख रुपये भरणा केल्यानंतर पडते यांनी फोन करून सांगितले की, पाटील याला पैसे देऊ नको; मात्र तोपर्यंत 1 लाख रुपये भरणा केली होती. ही भरणा माझा मुलगा अनुपसेन सावंत यांनी केली. बँकेमध्ये जाऊन चौकशी केली असता भरणा केलेली रक्कम गुडगेकर यांनी काढल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार सावंत यांनी केली. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात सचिन परदेशी उर्फ पाटील व मंदार लक्ष्मण गुडगेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com