शिवज्योतीचे स्वागत

शिवज्योतीचे स्वागत

rat१०१९.TXT


फोटो ओळी
- rat१०p१२.jpg-
८८१०४
लांजा ः विशाळगडावरुन शिवज्योत आणणारे मावळे.
-----------
विशाळगडावरुन आणलेल्या
शिवज्योतीचे लांजात स्वागत

लांजा ः भल्या पहाटेला माचाळ मार्गे खडतर प्रवास करत लांजा येथील बजरंग दलाचे बजरंगी आणि श्री शिवप्रतिष्ठानच्या २२ मावळ्यांनी अनवाणी विशाळगडावरुन लांजा येथे आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. सगळे मावळे माचाळमार्गे खडतर प्रवास करत आठ वाजता विशाळगड येथे दाखल झाले. त्यांनी गडावरील तीन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथून शिवज्योत घेऊन पुन्हा माचाळमार्गे केळवली येथे आले. केळवली येथे उपसरपंच पांडुरंग साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सर्व मावळ्यांचे आणि शिवज्योतीचे स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. या ठिकाणी सर्व मावळ्यांना अल्पोपहार देण्यात आला. यानंतर सर्व मावळे गोवीळ- वाडगाव मार्गे लांजा येथे दाखल झाले. लांजा येथील बसवेश्वर चौकात सर्व मावळ्यांचे आनंदी भोजनालयाचे मालक तुळसणकर दांपत्याने पाद्य पूजा करून औक्षण व स्वागत केले. त्या नंतर शिवज्योत लांजा येथील राम मंदिर मध्ये नेण्यात आली. तेथे पुन्हा एकदा लांजा वासियांतर्फे औक्षण व पूजा करण्यात आली. तेथेच भंडाऱ्याचा कार्यक्रमही झाला.
---

लांजा शहरात रोज बलिदान मास

लांजा ः श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ (फाल्गुन शुद्ध द्वितीया ते फाल्गुन अमावस्या) या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास लांजा येथील छत्रपती शिवाजी चौक, साटवली रोड येथे रात्री साडेआठ ते रात्री नऊ पर्यंत रोज पाळला जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने कसबा येथे अटक करण्यात आली. त्यानंतर कसबा ते वढु बुद्रुकपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल करत क्रूरकर्मा औरंगजेबाने त्यांची धिंड काढली आणि अखेर शंभूराजांना वढु बुद्रुक येथे वीरमरण आले. शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना लक्षात यावी यासाठी हा बलिदानमास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे सर्वत्र पाळला जातो. लांजा शहरातील छत्रपती शिवाजी चौक, साटवली रोड येथे रात्री ८ तीस ते रात्री ९ पर्यंत रोज हा बलिदान मास पाळला जात आहे.

-
फोटो ओळी
- rat१०p१०.jpg -
८८१०२
डेरवण : द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या दिपांशु भुवड चा गौरव करण्यात आला.
----
लांब उडी, धावणेत दिपांशु भुवडचे यश

मंडणगड ः तालुक्यातील गोठे गावचा खेळाडू दिपांशु प्रवीण भुवड याने राज्यस्तरीय स्पर्धेत दोन खेळात यश संपादन केले. कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अथेलेटिक्स सस्पर्धेत १० वर्षे वयोगटात लांब उडी क्रीडा प्रकारात ३.८६ सेंटिमीटर उडी मारून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच डेरवण येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य युथ गेममध्ये लांब उडी १० वर्षे वयोगटात ३.९३ सेंटिमीटर उडी मारून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ५० मीटर धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. दिपांशु व प्रशिक्षक असणारे वडील प्रवीण भुवड यांचे या तिहेरी यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com