
चिपळूण ः धामणदेवीत राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर
ratchl102.jpg-
88114
चिपळूणः श्रमसंस्कार शिबीरात सहभागी झालेले विद्यार्थी
धामणदेवीत राष्ट्रीय सेवा
योजना निवासी शिबीर
चिपळूण, ता. १०ः खेड तालुक्यातील धामणदेवी येथे चिपळूण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर झाले. या उपक्रमाबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरात रोहिदास समाज मंदिराचे रंगकाम व लाईट फिटिंग आवारातील स्वच्छता, घरकुल योजने अंतर्गत बांधलेल्या घरातील वीज जोडणी, बालवाडी मध्ये विद्युत पंखा बसविणे ही नियोजित कामे करण्यात आली. तसेच श्री. गोरे व श्री. चिपळूणकर यांचे ''निरामय जीवनशैली व भारतीय संविधान व तिची नीतिमूल्ये'' या विषयांवर व्याख्यान आयोजित केले होते.
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक साक्षी गजमल व संकेत भुवड यांनी मनोगत व्यक्त केले. धामणदेवीच्या सरपंच संजीवनी नरळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, रोहिदास वाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांचा व गटनिदेशकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच संजीवनी नरळकर, रोहिदास वाडी अध्यक्ष प्रकाश पेवेकर, प्रभाकर पेवेकर उपस्थित होते.