महिलांनो स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनो स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या
महिलांनो स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या

महिलांनो स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या

sakal_logo
By

rat१०२२.aci

बातमी क्र. २२ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
- ratchl१०१.jpg- चिपळूण ः महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर प्रसंगी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सायली माधव आणि महिला कर्मचारी.

महिलांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे

डॉ. सायली माधव ः लाईफ केअर हॉस्पिटलतर्फे शिबीर

चिपळूण, ता. १० ः जागतिक महिला दिनानिमित्त लाईफ केअर हॉस्पिटलने हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या सहकार्याने कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना शारीरिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आऱोग्याला प्राधान्य देतानाच नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन लाईफ केअर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सायली माधव यांनी केले.
विविध जबाबदाऱ्या सांभाळताना,‎ महिलेचे आपल्या आरोग्याकडे‎ दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक‎ छोट्या-मोठ्या व्याधींना सामोरे‎ जावे लागते. पण वेळीच आजाराचे निदान झाल्यास त्यावर तातडीने उपचार करणं शक्य होतं. त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच आरोग्य तपासणी करून घ्यावी, असा संदेश या आरोग्य शिबीराद्वारे देण्यात आला आहे. या शिबीरात कंपनीतील १८ ते ५० वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या. मार्गदर्शन करताना डॉ. सायली म्हणाल्या, महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या स्वतःची काळजी घेत नाहीत. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, नोकरीसाठी होणारी धावपळ, ताणतणाव, बैठे कामाच्या पद्धती, त्यामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी, वेळेचा अभाव असल्याने व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महिलांना विविध व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यानं आजार बळावतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.