विद्यार्थिनींनी साकारलेल्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनींनी साकारलेल्या
वेशभूषा ठरल्या लक्षवेधी
विद्यार्थिनींनी साकारलेल्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

विद्यार्थिनींनी साकारलेल्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

sakal_logo
By

88123
बांदा ः केंद्रशाळेत विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा साकारून महिला दिन साजरा केला.


विद्यार्थिनींनी साकारलेल्या
वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

बांद्यातील महिलादिन, शिक्षिकेंचाही सहभाग

बांदा, ता. १० ः जिल्हा परिषद बांदा क्रमांक १ केंद्रशाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थीनींनी विविध प्रकारची सामर्थ्यवान व प्रभावशाली स्त्रीयांची वेशभूषा साकारून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी नारीशक्ती गीतगायन केले व शाळेतील महिला शिक्षिकांच्यावतीने केक कापून महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थिनींनी पोलिस, शिक्षिका, भाजीवाली, डॉक्टर, नर्स, सिनेकलाकार, शेतकरीण, मासेवाली असे विविध व्यावसायिक, क्रिकेट, बॅटमिंटन, बॉक्सिंग अशा प्रकारच्या विविध महिला खेळाडू, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अंतराळवीर कल्पना चावला अशा थोर महिला तसेच जिल्हाधिकारी, भारतमाता तसेच गुजराती, राज्यस्थानी अशा विविध प्रांतिक प्रकारच्या लक्षवेधी वेशभूषा विद्यार्थिनींनी साकारल्या. तसेच वेशभूषेच्या भूमिकीचे सादरीकरणही केले. यावेळी महिला शिक्षकांनीही व्यावसायिक व खेळाडूंच्या लक्षवेधी वेशभूषा साकारल्या. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाविषयी माहिती दिली. जे. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसिका मालवणकर, जागृती धुरी, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे यांनी परिश्रम घेतले.