
नांदगाव कोळंबाचा 7 मेस जत्रोत्सव
88126
श्री देव कोळंबा मंदिर
नांदगाव कोळंबाचा
७ मेस जत्रोत्सव
नांदगाव ः येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा ७ मेस आयोजित केली आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या जत्रोत्सवास भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.
----------
88164
नील बांदेकर
वक्तृत्व स्पर्धेत
नील बांदेकर प्रथम
बांदा ः कोल्हापूर येथील शिवाजी भोसले एज्युअर्ड आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्रशाळा बांदा नंबर एकमधील चौथीत शिकणाऱ्या नील बांदेकर याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई या संस्थेमार्फत घेतलेल्या वेशभूषा स्पर्धेत तो राज्यात पहिला तसेच रंगोत्सव २०२२-२३ च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हस्ताक्षरमध्ये गोल्ड मेडल मिळवत त्याने स्केचिंग स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक प्राप्त केले. त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त झालेल्या विविध वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धेतही तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
-----------
पडवे येथे आज
आरोग्य शिबिर
मालवण : महिला दिनाचे औचित्य साधून भाजप मालवण तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्यावतीने उद्या (ता.११) दुपारी ३ ते ६ या वेळेत दैवज्ञभवन येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. स्तनाचा कर्करोग आवश्यक असल्यास मॅमोग्राफी पूर्णपणे मोफत, सारवायकल कर्करोग तपासणी, नेत्र चिकित्सा, तोंडाचा कर्करोग तपासणी केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष पूजा करलकर, मालवण शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर यांच्याशी संपर्क साधावा.
--
शिडवणे शाळेत
महिलादिन थाटात
कणकवली ः शिडवणे क्रमांक १ शाळेत जागतिक महिला दिन साजरा झाला. उपशिक्षिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार, अंगणवाडी सेविका पाटणकर, मदतनीस केतकरबाई यांचा सन्मान करण्यात आला. धनश्री सुतार हिने ‘घे भरारी नारीशक्ती’ या गीतावर नृत्य सादर केले. शफा शेख, जोया शेख, फरीन शेख, अनुष्का जाधव, तनिष्का पाटणकर, श्रावणी भोवड या मुलींनी एक समूहनृत्य सादर केले. उपाध्यक्षा समिता सुतार यांनी महिलांच्या सबलीकरणावर आधारित एका कवितेचे सुमधुर गायन केले.