‘गोमू’ खेळातून आचऱ्यात विकासकामे

‘गोमू’ खेळातून आचऱ्यात विकासकामे

88122
आचरा ः गावात शिमगोत्सवातील एक क्षण.

‘गोमू’ खेळातून आचऱ्यात विकासकामे
आचरा ः आचरा-वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळ, पारवाडी मंडळाचे युवा वर्ग गोमूचे खेळ काढून मनोरंजनाबरोबरच यामधून मिळणाऱ्या पैशांतून वाडीतील विकासकामे करत आहेत. विविध पात्रांसोबत गोमू बनलेले युवक सामाजिक जाणिवेतून एकत्र येत आहेत. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठही सहभागी होऊन गोमू खेळाचा उत्साह वाढवीत आहेत. याअगोदरही देऊळवाडी घाडी मंडळाकडूनही शिमगोत्सवातील खेळ काढून आपल्या भागातील विकासकामे केली होती. गोमू खेळातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मंडळांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
------------
88130
अॅड. राजीव बिले

अॅड. बिले यांना बेस्ट मेडिएटर अवॉर्ड
कुडाळ ः येथील न्यायालयातील ट्रेन मेडिएटर अॅड. राजीव बिले यांना मुंबई उच्च न्यायालयामार्फत दिला जाणार यावर्षीचा बेस्ट मेडिएटर हा अवॉर्ड जाहीर झाला आहे. डायरेक्टर को-ओर्डिनेटर मेन मेडिएशन सेंटरमार्फत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे याबाबत त्यांना पत्र आले आहे. स्टेट बेस्ट मेडिएटर अवॉर्डकरिता स्टेट एकंदरीत १५ मेडिएटर यांची संपूर्ण महाराष्ट्रमधून निवड करण्यात आली असून त्यात अॅड. बिले यांची निवड झालेली आहे. हा अवॉर्ड मुंबई उच्च न्यायालयामार्फत ११ मार्चला न्यायिक ट्रेनिंग सेंटर, उत्तान मुंबई येथे स्टेट कॉन्फरन्समध्ये दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com