माणगावात महिलादिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगावात महिलादिन उत्साहात
माणगावात महिलादिन उत्साहात

माणगावात महिलादिन उत्साहात

sakal_logo
By

88154
माणगाव ः येथे कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना माणगाव वाचनालयाच्या उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर. शेजारी सरपंच मनिषा भोसले, किर्ती वालावलकर, साक्षी मेस्त्री आदी.

माणगावात महिलादिन उत्साहात
माणगांव, ता. १० ः येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा सभागृहामध्ये माणगाव ग्रामपंचायत, नवदिशा प्रभात संघ, लोकमान्य मल्टीपर्पज बँक आणि श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लोकमान्य बँकेचे शाखा व्यवस्थापक रानडे यांनी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली.
यावेळी प्रभात संघाच्या मार्फत माणगावच्या नूतन महिला सरपंच मनिषा भोसले, वाचनालयाच्या उपाध्यक्षा स्नेहा फणसळकर, लोकमान्य बँकेच्या किर्ती वालावलकर, बँक आॕफ बडोदाच्या रिमा भोसले, बँक आॕफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यांचा सत्कार करण्यात आला. बांबूपासून विविध उपयुक्त आणि शोभिवंत वस्तू तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या सुगंधा कदम हिचा आदर्श महिला म्हणून विशेष सत्कार झाला. बचत गटाच्या सीआरपींचा यावेळी विशेष पदक देऊन गौरव केला. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या बचत गटांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. वाचनालयातर्फे बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या साक्षी मेस्त्री यांचे कर्तृत्ववान महिला म्हणून सत्कार केला. यावेळी स्नेहा फणसळकर यांनी ‘महिलांचे आरोग्य’ विषयी मार्गदर्शन केले. बचत गटाच्या महिलांनी अतिशय उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. साक्षी मेस्त्री यांनी आभार मानले.