राजापूर-प्रतिकूल हवामानात फळपीक विम्याचा आधार

राजापूर-प्रतिकूल हवामानात फळपीक विम्याचा आधार

rat१०p१.jpg
88055
राजापूरः फळगळती झाल्याने खराब झालेला आंबा.
rat१०p२.jpg
88056
राजापूरः वाढत्या तापमानाने आंबा भाजून निघत आहे.
-------------------

प्रतिकूल हवामानात फळपीक विम्याचा आधार
शेतकरी झाले जागरुक; ३२ हजार जणांनी केला विमा
राजापूर, ता. ९ः गेल्या काही वर्षामध्ये अवेळी पडणारा पाऊस, कमी-जास्त होणारे तापमान, वेगाचा वारा आदी प्रतिकूल परिस्थितीने आंबा-काजू पिकाला चांगलात तडाखा बसला. सातत्याने प्रतिकूल राहणार्‍या स्थितीमुळे आंबा-काजू शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. मात्र, त्यांना शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेने मदतीचा हात दिला आहे. प्रतिकूल स्थितीने होणाऱ्या नुकसानीचे पिकविम्याचे महत्व लक्षात घेवून यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार शेतकऱ्यांना फळपिक विमा उतरविला आहे. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी फळपिक विमा उतरविला आहे.
गेल्या काही वर्षामध्ये हवामानामध्ये सातत्याने प्रतिकूल बदलाव होताना दिसत आहेत. सातत्याने कमी-जास्त होत असलेले तापमान, अवेळी पडणारा पाऊस, त्याच्या जोडीला वेगाने वाहणारे वारे, गारपीट पडणे अशा घटना घडत आहेत. या साऱ्या बदलणाऱ्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिकूल स्थितीचा कोकणातील शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगामातील उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असलेल्या आंबा अन् काजू पिकाच्या उत्पन्नावर होवू लागला आहे. यामध्ये खर्च जादा आणि उत्पन्न कमी राहील्याने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडून गेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये सातत्याने बदलाव होत आहेत. काही भागामध्ये अवकाळी पावसासह वेगाने वारे वाहून नुकसान झाले आहे. या साऱ्या प्रतिकूल स्थितीचा आंबा-काजू बागायतदारांना चांगलाच आर्थिकदृष्ट्या फटका बसणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये फळपिक विम्याने शेतकरी, बागायतदारांना काहीसा मदतीचा हात दिला आहे.
यावर्षी जिल्ह्यातील ३२ हजार ३९८ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे. त्यामध्ये २६ हजार ६५८ आंबा बागायतदार तर, ५ हजार ८८० काजू बागायतदारांचा समावेश आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ३४ हजार ३४ रूपयांची विमा हफ्ता रक्कम भरणा केली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिकूल हवामानाचा आंबा आणि काजू बागायतदारांना फटका बसला आहे. त्यामुळे फळपिक विमा उतरविलेल्या किती शेतकऱ्यांना यावर्षी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चौकट
गतवर्षी ७५ कोटी ९८ लाखाची भरपाई
गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ३८० आंबा आणि ४ हजार २३१ काजू शेतकरी असे मिळून २६ हजार ६११ शेतकर्‍यांनी पिकविमा उतरविला होता. त्यासाठी सुमारे ३० कोटी ८० लाख ५४ हजार ८०५ रूपयांचे विमा रक्कम भरणा केली होती. त्यातून, शेतकर्‍यांना सुमारे ७५ कोटी ९८ लाख ६८ हजार २३६ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती.

चौकट
रत्नागिरी जिल्ह्याचा दृष्टीक्षेपात फळपिक विमा
वर्ष २०२१-२०२२ २०२२-२०२३
विमा उतरविलेले शेतकरीः २६६११ ३२३९८
क्षेत्रः १४७३२.८९ १७८७८
शेतकरी विमा हफ्ताः ३०,८०,५४,८०५ २०,८५,३४,०३४
विमा संरक्षित रक्कमः १,९५,१४,६०,६११ २,३६,२०,१०,०७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com