ःपोषण आहार, धान्य वाटप कमिशन रखडले

ःपोषण आहार, धान्य वाटप कमिशन रखडले

rat१०४.txt

बातमी क्र. ४ (टुडे पान १ साठी)

पोषण आहार, धान्य वाटप कमिशन रखडले

अशोकराव कदम ; धान्य दुकानदार संतप्त

चिपळूण, ता. १० ः जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना मागील आठ वर्षांपूर्वीचे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रलंबित वाहतुकीचे कमिशन व रिबेटची देय रक्कम, नियमित धान्य वाटपाचे गेल्या सहा महिन्यांपासून आणि गेल्या दोन महिन्यांपासून मोफत धान्य वाटपाचे कमिशन अद्याप मिळालेले नाही. यामुळे रेशन दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा संघर्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिला आहे.
रेशन व्यवस्थित अन्न धान्य प्रणाली अधिक सक्षम गतिमान व पारदर्शक राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासन नवनवीन संकल्पना मांडत आहे. या योजनांचा रेशन प्रणालीत सर्व नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोना काळात रेशन दुकानदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र गेल्या काही वर्षांपासून रेशन दुकानदारांना वाहतूक रिबेट व अन्नधान्य वाटप कमिशनसाठी सातत्याने झगडावे लागत आहे. अजूनही या रेशन दुकानदारांचा संघर्ष संपलेला नाही. यामध्ये आता शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वाहतुकीचे कमिशन व रिबेटची रक्कम अद्याप मिळाली नाही. जुलै २०१० अखेर ३१ लाख ८६ हजार ४४६ इतकी रक्कम रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना शासन देय आहे. यामध्ये मंडणगड तालुका १ लाख १२ हजार ७०८ रुपये, दापोली- ५४ हजार ४८८, खेड- ७ हजार ७११, गुहागर- ८६ हजार ७६१, चिपळूण- २२ लाख १५ हजार ७००, संगमेश्वर- २ लाख ८८ हजार ६४४, लांजा- ७१ हजार ७५४, राजापूर- ३ लाख ४८ हजार ४४६ अशी तालुकानिहाय रेशन दुकानदारांना देय आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, शासनाने या प्रस्तावाकडे अध्याप लक्ष न दिल्याने रेशन दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील सहा महिन्यांपूर्वीचे नियमित धान्य वाटपाचे कमिशन मिळाले नाही. केंद्र शासनाने रेशन कार्डधारकांना मोफत धान्य जाहीर केले आहे. या मोफत धान्य वाटपाचे कमिशनही दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. एकंदरीत शासन रेशन दुकानदारांकडून आपल्या योजना राबवून घेत आहे. परंतु या दुकानदारांना कमिशन देण्याबाबत हात आखडते घेत आहेत. याबाबत रेशन दुकानदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता या दुकानदारांचा संयम सुटत चालला असून याबाबत रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार- केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आक्रमक झाले आहेत. शासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला संघर्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com