आमदार रवींद्र फाटक आज कुडाळात
आमदार रवींद्र फाटक आज कुडाळात
कुडाळ ः कणकवली येथे उद्या (ता.११) होणाऱ्या जाहीर सभेसाठी जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांना पद मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे जिल्ह्यात सर्व ठिकाणी स्वागत होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत ते कुडाळ शिवसेना कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहेत. त्यांच्यासमवेत राज्याचे शालेयमंत्री दीपक केसरकर, ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत, पक्षाचे नेते, पदाधिकारी असणार आहेत, अशी माहिती महिला जिल्हा आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी दिली. कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेत जिल्ह्यातील अनेकांचा प्रवेश होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाचे जे सरपंच व सदस्य निवडून आलेत, त्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
------------
कुडाळात उद्या शिशुमेळावा
कुडाळ ः विद्याभारती, सिंधुदुर्ग संचलित शिशुमेळावा हा शिशुनगरी, सुशीला शिशुवाटिका, हिंदु कॉलनी, कुडाळ येथे रविवारी (ता.१२) दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित केला आहे. भारतीय पद्धतीच्या शिक्षणाचा सिंधुदुर्गात सुरु असलेला प्रयोग पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. शैक्षणिक प्रगती म्हणजे केवळ बौद्धिक विकास नव्हे, केवळ लेखन, वाचन नव्हे.तर पूर्व प्राथमिक शिक्षणात प्रयोगशाळा, स्वयंपाकघर, चित्रशाळा, कलाशाळा, कार्यशाळा, रंगमंच, बाग, प्रदर्शनी, तरण तलाव, प्राणी संग्रहालय, वस्तु संग्रहालय, क्रीडांगण आदींचा वापर करून पूर्व प्राथमिक शिक्षण दिल्यास सर्वांगीण विकास कसा होईल? आणि बालकांचे शिक्षण हे कंटाळवाणे न होता आनंददायी कसे होईल? हे समजून घेण्यासाठी भेट द्या, असे आवाहन शिशुवाटिका प्रमुख श्रीमती विजया रामाणे अध्यक्ष, विद्याभारती, सिंधुदुर्ग, डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी योगिता कवठणकर, कविता कुंटे यांच्याशी संपर्क साधावा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.