
छत्रपती शिवाजी महाराजांना सावंतवाडीत शिवसेनेतर्फे वंदन
88173
सावंतवाडी ः येथे शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना
सावंतवाडीत शिवसेनेतर्फे वंदन
सावंतवाडी,ता.१० ः येथील शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या प्रतिमेसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा महिला संघटक ॲड. नीता कविटकर, माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, स्वप्ना नाटेकर, विश्वास घाग, परशुराम चलवाडी, एकनाथ हळदणकर, बापू कोठावळे, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, भारती परब, साधना मोरे, पूजा नाईक, सीमा सोनटक्के, नीलिमा चलवाडी, मनीषा परब, लक्ष्मी मेस्त्री, पुनम जामसंडेकर, सत्वशीला कुपवडेकर, सायली होडावडेकर, सुवर्णा गाड, लतिका सिंग, विद्या सावंत आदी उपस्थित होते.
--------
‘आयपीएचएस’ अंतर्गतच्या
डॉक्टरांच्या सेवा स्थगित
कणकवली, ता. १० ः जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ‘आयपीएचएस’ अंतर्गत कार्यरत असलेल्या अर्धवेळ व ऑनकॉल’ डॉक्टरांच्या सेवा स्थगित केल्या आहेत. हा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे यांच्या ९ मार्चच्या पत्राने जाहीर करण्यात आला आहे.
‘आयपीएचएस’ योजनेंतर्गत २०२२-२०२३ वर्षाकरिता कमी प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने या सेवा स्थगित केल्याचे पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. अशा स्थितीत अर्धवेळ व ‘ऑनकॉल’ डॉक्टरांच्या सेवा स्थगित केल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा कशी दिली जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कणकवली रुग्णालयात सर्जन डॉ. महेंद्र आचरेकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय रासम आदींच्या सेवा लक्षवेधी ठरल्या. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये असे अर्धवेळच ‘ऑनकॉल’ डॉक्टर रुग्णांसाठी आधारवड ठरत आहेत डॉक्टरांच्या सेवा स्थगित केल्याने त्याचा सर्वसामान्य रुग्णांना फटका बसणार आहे.