
जनआक्रोश समितीने घेतली अजित पवारांची भेट
rat१०२५.txt
बातमी क्र. २५ (टुडे पान १ साठी)
फोटो ओळी
-rat१०p२२.jpg-
८८१७२
चिपळूण ः विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा करताना जनआक्रोश समितीचे अॅ़ड ओवीस पेचकर, आमदार शेखर निकम आदी.
-
जनआक्रोश समितीने घेतली अजित पवारांची भेट
महामार्ग दुरुस्ती ; २० मार्चला मुंबईत आंदोलन
चिपळूण, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. २० मार्चला मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या जनआक्रोश आंदोलनाची माहिती देण्यात आली. आमदार शेखर निकम यांनी वेळी उपस्थित होते.
महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावरचे खड्डेही बुजवले जात नाही. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासंदर्भात अधिवेशनात यावर सखोल चर्चा करावी अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. सरकारचे महामार्गाकडे लक्ष वेधण्यासाठी २० मार्चला काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश आंदोलनबाबत माहिती देण्यात आली. लक्षवेधीमध्ये महामार्ग संदर्भात विषय चर्चेत घेण्यात येईल व केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन यावर विशेष लक्ष देण्यात यावे व महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. जनआक्रोश समितीच्या वतीने याचिकेकर्ते अॅड. ओवेस पेचकर, समितीचे अध्यक्ष काका कदम, सहकार्याध्यक्ष अनिल काडगे, सरचिटणीस रुपेश दर्गे, अॅड. प्रथमेश रावराणे आदी उपस्थित होते.