बांदा केंद्रशाळेत दाखविला शिवरायांवर आधारित चित्रपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा केंद्रशाळेत दाखविला
शिवरायांवर आधारित चित्रपट
बांदा केंद्रशाळेत दाखविला शिवरायांवर आधारित चित्रपट

बांदा केंद्रशाळेत दाखविला शिवरायांवर आधारित चित्रपट

sakal_logo
By

88181
बांदा ः केंद्रशाळेत चित्रपट पाहताना विद्यार्थी.

बांदा केंद्रशाळेत दाखविला
शिवरायांवर आधारित चित्रपट
बांदा, ता. १० ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून (तिथीप्रमाणे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘शेर शिवराय’ हा चित्रपट आज श्री स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांना मोफत दाखविण्यात आला. यावेळी मुलांना चित्रपटाच्या मध्यंतरात इतिहासावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मुलांनी देखील समर्पक उत्तरे दिली.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी बांद्यात मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिवविचारांवर काम करणाऱ्या प्रतिष्ठानने बांदा शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज केंद्रशाळेत झाली. मुख्याध्यापक आजगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, संस्थेचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर सावंत, खजिनदार भूषण सावंत, अक्षय मयेकर, नारायण बांदेकर, तनिष मेस्त्री, शुभम बांदेकर, शिक्षक जे. डी. पाटील, गोपाळ साबळे, सरोज नाईक, शीतल गवस आदी उपस्थित होते. यावेळी प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने बक्षिसांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी आभार मानले.