
आंबोलीत राजे प्रतिष्ठानतर्फे शिवरायांना अभिवादन
88183
आंबोली ः येथील कामतवाडी येथे राजे प्रतिष्ठानतर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.
आंबोलीत राजे प्रतिष्ठानतर्फे
शिवरायांना अभिवादन
आंबोली, ता. १० ः राजे प्रतिष्ठान कामतवाडी-आंबोली यांच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मशाल आणणे, त्यानंतर शिव जन्मोत्सव, लहान मुलांचे शिवाजी महाराजांवरील कार्यक्रम, फोटो प्रदर्शन, बक्षीस वितरण, मिरवणूक असे कार्यक्रम झाले.
येथील कामतवाडी येथे राजे प्रतिष्ठानतर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी कामतवाडी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उल्हास गावडे, बबन गावडे, योगेश गावडे, गुणाजी गावडे, भिसाजी गावडे, विलास गावडे, सतीश गावडे, भिवा गावडे, चेतन गावडे, संदेश राणे, संतोष नाटलेकर, शंकर सावंत, अरविंद गावडे, अनंत पडते, लक्ष्मण गावडे, अनिल गावडे, अंकुश गावडे, दशरथ गावडे, सोमा गावडे, प्रसाद गावडे, शंकर गावडे तसेच सर्व कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सावित्री पालेकर, पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे, जगन्नाथ गावडे, शिक्षक कोल्हे, मोहन पाटील, राऊत, उपस्थित होते. या ठिकाणी प्राथमिक शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कलाकार विशाल गावडे, खेळाडू प्रथमेश गावडे, चित्रकार शुभम गावडे, अनंत पडते यांचा सत्कार झाला.