जिल्हा पोलिस दलात 350 ''लेडी सिंघम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा पोलिस दलात 350 ''लेडी सिंघम
जिल्हा पोलिस दलात 350 ''लेडी सिंघम

जिल्हा पोलिस दलात 350 ''लेडी सिंघम

sakal_logo
By

rat१०१३.txt

बातमी क्र. १३ (टुडे पान १ साठी)

जिल्हा पोलिस दलात ३५० ''लेडी सिंघम''

पोलिस दलाच्या २३ टक्के ; दलातील पुरूषांच्या बरोबरीने काम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : जिल्हा पोलिस दलात महिला अधिकारी आणि महिला पोलिसांची संख्या वाढत आहे. दलातील अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ सुमारे १ हजार ५०० इतकी आहे. यापैकी ३५० एवढी संख्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे. पोलिस दलात २३ टक्के महिला आहेत. कुठल्याही प्रकारचा गुन्हे असो, बंदोबस्त असो, आणीबाणीची परिस्थिती, मोर्चा असो, या लेडी सिंघम पुरुषांच्या बरोबरीने काम करत आपले सामर्थ्य दाखवून देत आहेत.
पोलिस दलात भरती होण्याचे महिलांचे प्रमाणही दिसेंदिवस वाढत आहे. या दलामध्ये प्रचंड काम असले तरी एक वेगळा मान, सन्मान मिळत असल्याने उच्च शिक्षित तरुणी या दलाकडे वळत आहेत. या महिलांना कोणतीही जबाबदारी, बंदोबस्तासाठी किंवा गुन्ह्याची उकल करण्यासाठी त्या नेहमी सज्ज असतात. तास न तास उन्हात उभे राहून कर्तव्य बजावावे लागते. अव्याहत कर्तव्य बजवावे लागत असल्याने या क्षेत्रात येणाऱ्या महिलांची संख्या कमी होती. परंतु त्रास असला तरी तो रुबाब देखील याच दलात आहे, हे लक्षात आल्याने महिला पोलिस दलाकडे वळु लागल्या आहेत. पोलिस भरतीची पुर्वतयारी म्हणून महिला अॅकॅडमी देखील जॉइन करत आहेत. राज्यात पोलिस दलामध्ये ११.७५ टक्के महिलांचे प्रमाण आहे.
महिला पोलिस शहरातही कर्तव्यात आहेत. रत्नागिरीतही बंदोबस्त किंवा गस्तीसाठी महिला पोलिस कार्यरत असतात. राजकीय नेत्यांचे दौरे वाहतूक नियमन आदीत महिला पोलिस पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य बजावत असतात. जिल्ह्यात महिला पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस यांची संख्या ३५० आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, मंडणगडच्या पोलिस निरीक्षक शैलजा सावंत, रत्नागिरीतील जिल्हा विशेष शाखेच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्यासह २० महिला अधिकारी आणि महिला पोलिस ३३० आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदाची धुरा जयश्री गायकवाड या सांभाळत आहेत. यापूर्वीही त्यांनी उपविभागीय जयश्री गायकवाड पोलिस अधिकारी म्हणून यशस्वीरित्या पदभार सांभाळला आहे. निशा जाधव या सध्या रत्नागिरीतील जिल्हा विशेष शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी देवरुख, मंडणगड येथे मंडणगडच्याही पोलिस निरीक्षक शैलजा सावंत या महिला अधिकारी आहेत.