
फोटोसंक्षिप्त-टेबल टेनिस स्पर्धेत आर्या दिघेने सुवर्ण
८८१९३
टेबल टेनिस स्पर्धेत
आर्या दिघेला सुवर्ण
मालवण : श्री. विठ्ठलराव चॅरिटीज ट्रस्ट डेरवण यांच्या वतीने घेण्यात आलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दिघेने सुवर्णपदक तर प्राची चव्हाणने रजत पदक पटकाविले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुर्वा चिपकरने कांस्य तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात गणेश चव्हाणने कांस्य पदक मिळविले. या स्पर्धेत आर्या दिघे हिने १३ आणि १७ वर्षांखालील गटात ही रजत पदकावर मोहोर उमटवतीना आपल्या चतुरस्त्र खेळाची झलक दाखवून सर्वांची वाहवा मिळवली.
याशिवाय प्रज्वल नामनाईक, सई कांबळी यांनी उपांत्य फेरीत तर वीरा वारंग, वर्षा परुळेकर, आधिष पेडणेकर, प्रत्युष शेट्टीगार, दीक्षांत शिवापूरकर, लौकिक तळवडेकर यांनी उपांत्य पूर्व फेरीमध्ये मजल मारली. ही सर्व मुले विष्णू कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण टेबल टेनिस अकॅडमी मध्ये सराव करतात. सहभागी आणि यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन होत आहे.
कणकवलीत २१ मेस
उपनयन संस्कार कार्यक्रम
कणकवली ः कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवलीतर्फे तालुक्यातील कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजातील उपनयन संस्कार कार्यक्रम २१ मेस संस्थेच्या फोंडाघाट येथील पूर्णानंदभवन येथे आयोजित केला आहे. ज्ञातीतील ज्या बटूंच्या मौजी या कार्यक्रमात करायच्या आहेत, त्यांच्या पालकांनी बटूंची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी १० मेपर्यंत संपर्क साधायचा आहे. अधिक माहितीसाठी राजेश आजगावकर, गजानन इलेक्ट्रिकल्स, कणकवली, हर्षल गवाणकर, रामचंद्र बावकर, अरुण सामंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यवाह अॅड. नारायण ऊर्फ नानू देसाई यांनी केले आहे.