सावंतवाडीत उद्या वधू वर मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत उद्या वधू वर मेळावा
सावंतवाडीत उद्या वधू वर मेळावा

सावंतवाडीत उद्या वधू वर मेळावा

sakal_logo
By

सावंतवाडीत उद्या वधू वर मेळावा
कुडाळ ः अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय वधू वर मेळावा रविवारी (ता.१२) सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता या वेळेत आरपीडी स्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्या सर्वांना एकत्रित करून समाजातील वधूवरांसाठी उपयुक्त आणि सोयीस्कर अशा स्वरूपाचे वधू-वर सूचक व्यवस्था असणे गरजेचे आहे. म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश वधू व वरांसाठी हवी असणारी योग्य माहिती, स्थळे त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा आहे. मुख्य असे की वधू व वराने दिलेली माहिती त्याची सत्यता पडताळणे हाही आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे स्थळाच्या माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली. मेळाव्यासाठी प्रमाणात वधू-वर उपस्थित राहणार मोठ्या आहेत. प्रत्यक्ष वधू-वर परीक्षण करून योग्य स्थळाची निवड करावी, असे आवाहन अ‍ॅड. सावंत यांनी केले आहे.